अभिनयाचं विद्यापीठ हरपलं… ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन…..!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या १७ दिवसांपासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार सुरू होते. मात्र आज २६ नोव्हेंबर रोजी १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. गोखले यांना मधुमेह आणि जलोदर झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद देणं हळूहळू बंद झालं आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्सित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांना अखेरचा सिनेमा ठरला.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *