Share Now
विशेष वृत्त प्रकाश कांबळे
कोल्हापूर: वाठार ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रस्ताविकेचे पूजन सरपंच सौ तेजस्विनी वाठारकर यांच्या हस्ते करण्यात आले तर संविधान प्रस्तावना पत्रिकेचे वाचन ग्राम विकास अधिकारी डी डी शिंदे यांनी केले
यावेळी संविधान दिनाच्या निमित्त कायद्याविषयी ग्रा पं सदस्य सुहास पाटील, युवा पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कांबळे, ग्रा पं सदस्य महेश शिर्के यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी ग्रा पं सदस्य सागर कांबळे, गजेंद्र माळी, शिवसेना शहर प्रमुख संदीप चौगुले, माजी सरपंच नाना कुंभार, क्लार्क संभाजी भोसले, विशाल कांबळे, शिवाजी गायकवाड, सुनील कांबळे, महेश कुंभार, अजित कांबळे आदी उपस्थित होते स्वागत सागर कांबळे यांनी केले तर आभार ग्रा पं सदस्या सौ नाजुका भुजिंगे यांनी मानले
Share Now