Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
कोल्हापूर प्रतिनिधी :दि.२१ :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत राष्टीय महाराष्ट्रात आर्थिक दुर्बल घटक इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा रविवारी ८ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आली. या परीक्षेत देशभूषण हायस्कूलचा विद्यार्थी आरुण डेमश्या पावरा याने यश मी मिळवले, असून तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.
त्याला इयता ९वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु .१०००/- (वार्षिक रु.१२०००/-) इतकी शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे.
आरुण पावरा या विद्यार्थ्याला विभागप्रमुख ए. एस.पाटील, शिक्षिका एस.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक आर.ए.गाट यांचे प्रोत्साहन लाभले .
Share Now