Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापुर : थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धावन्याच्या स्पर्धेत केवळ ३५ मिनिटात दहा किलोमीटर अंतर पूर्ण करत कोल्हापुरची सुवर्णकन्या धावपटू आसमा कुरणे सुवर्णपदकाची मानकरी ठरली. विसावा फाउंडेशनची दत्तक कन्या असलेल्या आसमाचे आणि आसमा सोबत कोल्हापूरात जन्मलेली पण शिक्षणासाठी पुण्यात असणारी भक्ती जाधव हिचे सुध्दा स्वागत आणि मिरवणूक विसासाने आयोजित केली तिने देखील या स्पर्धेत 200 मिटर धावणे गटात सुवर्ण पदक मिळवले. या दोन्ही सुवर्ण कन्येंचे राजारामपुरी येथील जनता बाजार चौकात स्वागत करुन वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. थायलंड येथील स्पर्धेनंतर बेळगांव विमानतळ येथून आसमाचे आणि भक्तीचे कोल्हापुरातील जनता बाजार चौक येथे आगमन झाले . आसमाला दत्तक घेतलेल्या विसावा फाउंडेशनचे प्रमुख आणि घोटणे डेव्हलपर्सचे राहुल घोटणे आणि आसमाचा मातापित्याप्रमाणे सांभाळ करणारे सचिन चव्हाण, सौ चैताली चाव्हाण, सौ.भाग्यश्री चव्हाण, प्रशिक्षक शामराव मासाळ यानी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले. तिथुन उघड्या जीप मधून वाद्यांच्या गजरात तिच्या मिरवणूकीचा प्रारंभ झाला. अग्रभागी आसमाच्या यशाची माहिती देणाऱ्या डिजिटल फलकासह ट्रैक्टर आणि नेत्रदीपक प्रकाशयोजना ध्वनी व्यवस्था असलेले वाहन सहभागी झाले होते .शिवाजी विद्यापीठामधील क्रीड़ापटू यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. राजारामपुरी मेन रोडवरुन ही मिरवणूक मार्गस्थ होताना वाटेत ठिकठिकाणी दुतर्फा उभे राहिलेल्या महिलानी औक्षण करुन आसमाचे अभिनंदन करत होत्या . आतिशबाजी करत आणि फटाके फोडून तिचे स्वागत केले जात होते. मारुती मंदिर ,आईचा पुतळामार्गे ही मिरवणूक प्रतिभानगर येथील चव्हाण दाम्पत्याच्या निवास स्थानी आली. तेथे सचिन चव्हाण,सौ.चैताली चव्हाण कुटुंबियांनी यानी आसमा आणि भक्तीचे औक्षण केले. यावेळी काही काळ येथील वातावरण भावुक झाले होते. यानंतर आसमाने चव्हाण दाम्पत्य आणि क्रीड़ापटू सहकारी यांच्यासोबत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि दसरा चौक येथे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शाहू यांना अभिवादन केले .