प्लॅस्टिक वरील बंदी उठणार व्यापाऱ्यांना दिलासा

प्लास्टिकवरील बंदी उठणार, व्यापार्यांना दिलासा

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

Advertisements

राज्य सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ६० जीएसएम (ग्रॅम प्रती चौरस मीटर) पेक्षा अधिक जाडी असलेले प्लास्टिक, पासून बनवलेल्या पिशव्या आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या पॅकेजिंग उद्योगात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला बंदीतून वगळण्यात येणार आहे.
लवकरच याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहितीआहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक मंडळ, तज्ज्ञ समितीच्या २५ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली.
वरील प्रकारचे प्लास्टिक बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी असलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे
प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. नुकताच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या राज्याच्या पर्यावरण विभागाच्या बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचना जारी करून काही सूट देत देशभरात प्लास्टिक बंदी लागू केली होती.
याबाबत आता व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *