मुक्त संवाद साधून एचआयव्ही रोखूया: अभिनेते सौरभ चौगुले….!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 58 Second

कोल्हापुर : “संवादाच्या माध्यमातून योग्य माहिती घेऊन संसर्गितांना समानतेची वागणूक देऊया”, असे आवाहन कलर्स मराठी वहिनी वरील’ जीव माझा गुंतला’ मालिकेत ‘मल्हार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते सौरभ चौगुले यांनी केले.

एड्स नियंत्रण विभागामार्फत ‘एड्स दिनानिमित्त’ जनजागृती फेरी….

जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे एड्स दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रभात फेरी उद्घाटन प्रसंगी ‘युथ आयकॉन’ म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रदीप दीक्षित अध्यक्षस्थानी होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक हूबेकर, प्राचार्या डॉ.सुप्रिया देशमुख , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात,बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक , डॉ.विनायक भोई , सहाय्यक आरोग्य अधिकारी मनिष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे, अधिसेविका नेहा कापरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, निरंजन देशपांडे , राजेंद्र मकोटे हे प्रमुख उपस्थित होते.

 पुढे बोलताना सौरभ चौगुले म्हणाले की , “युवा वर्गाने संकोच बाजूला ठेवून एकमेकांशी मोकळा संवाद साधला पाहिजे. योग्य शास्त्रोक्त ज्ञान मिळवले पाहिजे युवकांनी पुढाकार घेऊन एड्स जनजागृती करायला हवी”. अभिमान संस्थेचे विशाल पिंजानी एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी शून्यावर आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. असे मनोगतात सांगितले.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविकामध्ये ‘आपली एकता आणि समानता, एचआयव्ही सहज जगणाऱ्यांकरिता'(Equalize)हे यावर्षीचे एड्स दिनाचे ब्रीदवाक्य असल्याचे सांगून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एचआयव्ही एड्स नियंत्रणासाठी चालू असलेले कामकाज व उपक्रम याबद्दल माहिती दिली.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक हुबेकर यांनी उपस्थितांना एड्स मुक्ती, आणि कलंक व भेदभाव दूर करण्याची शपथ दिली.

यावेळेस एड्स दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पोस्टर्स स्पर्धांचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच २०२३ च्या आरोग्य दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. एव्हरेस्ट वीर कस्तुरी सावेकर यांच्यासह शहरातील महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि एड्स नियंत्रण कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी केले तर आभार मकरंद चौधरी यांनी मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *