Getting your Trinity Audio player ready...
|
अजय शिंगे
कोल्हापूर : स्विमिंग हब फौंडेशन च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथमच स्पर्धेसाठी टचपॅड या सुविधेचा वापर होनार असल्याने स्पर्धेला वेगळेच रूप येणार असल्याची माहिती दीपक घोडके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
स्पर्धेबाबत माहिती देताना दिपक घोडके म्हणाले की या स्पर्धेत भारत देशातून २८ राज्ये तसेच ८ केंद्रशासीत प्रदेशातून जलतरण खेळाडूना निमंत्रित केले आहे. प्रत्येक राज्यातील व केंद्रशासीत प्रदेशामधील जलतरण संघटनेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी खेळाडूपर्यंत स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी संघटनेच्या इ-मेल आयडी वरती वेबसाईट व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्र आज पाठवत आहोत. जलतरण खेळातील वय ८ ते वय २१ पर्यंतच्या मुले व मुली खेळाडूंनी सहभाग नोंदविण्यासाठी खेळांडूपर्यंत क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, जलतरण संघटना, फेसबुक, वॉटसअप, इन्स्टाग्राम व जलतरण प्रशिक्षक यांच्या माध्यमातून सदर स्पर्धेत सहभाग होण्यासाठी खेळांडूपर्यंत आज माहिती पोहचवत आहोत. सदरची स्पर्धा ही ५ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी सहभागी होणान्या खेळाडूंना स्पर्धेसाठी नॅशनल लेव्हलचा ५० मिटरचा जलतरण तलाव तसेच टच पॅड व स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या खेळांडूसाठी ग्रुप रुपयांची बक्षीस विक्री करणार आहे. स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असून ६ डिसेंबर २०२२ ते २७ डिसेंबर २०२२ रात्री ११ पर्यंत सुरू राहणार आहे स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी नोंदणी फी सहाशे रुपये असणार आहे तसेच इतर प्रतिमेसाठी १०० रुपये फी आकारली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. ही स्पर्धा रयत शिक्षण संस्थेच्या राज्याचे छत्रपती शाहू कॉलेज येथील राष्ट्रीय खेळाडू सागर पाटील जलतरण तलाव कदमवाडी रोड कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
यावेळी निलेश जाधव उमेश कोडोलीकर रमेश मोरे सदानंद सुर्वे समीर चौगुले अशोक पवार अमित पाटील विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.