Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात विविध मान्यवर व भीम अनुयायांकडून अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील,आ.ऋतुराज पाटील,आ.जयश्री जाधव, आ.जयंत आसगावकर,महापालिका प्रशासन कादंबरी बलकवडे यांच्यासह महापालिका अधिकारी,मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक आदींसह मान्यवरांनी अभिवादन केले.
रात्री बारा वाजता राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी ,आर पी.आय ,बहुजन परिवर्तन पार्टी,समता सैनिक दल यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.दरम्यान कोरोना कालावधीनंतर आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत आहेत. आज दिवसभरात सहाय्यक आयुक्त आणि ,समाजकल्याण कार्यालय यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रमां अंतर्गत रक्तदान शिबिर व चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.