Share Now
Read Time:57 Second
कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात सुरू असलेले वाद आणि होणारे पडसाद या अनुषंगाने महाविकास आघाडीने शनिवारी १० डिसेंबरला तीव्र आंदोलनाची करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात सीमा भागातील लोक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे.९ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे . याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
Share Now