Share Now
Read Time:54 Second
कोल्हापूर, दि. २१ : बहिष्कृत वर्गाच्या माणगाव परिषद शतक महोत्सवानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास आणि सुधारक गाव कामगार पाटील आप्पासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते. त्यांनीही यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Share Now