मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (दि.२१) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे सर्व भारतवासीयांना आवाहन केले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी कोरोनाला हरवण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व लोकांनी दि.22 मार्च रोजी घरीच थांबून जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करावा असे आवाहन सांगली शहर व जिल्हा वासियांना केले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जनता कर्फ्यू हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून गर्दीच्या ठिकाणी जाण्याने एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला होणाऱ्या संसर्गाला यामुळे आपण अटकाव करू शकतो सर्व सांगली जिल्हा वासियांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या, शहराच्या ,राष्ट्राच्या ,सुरक्षतेसाठी एक दिवस घराबाहेर न पडून जनता कर्फ्यू यशस्वी करावा असे आवाहन करून जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी अनेक व्यापारी संघटना व अन्य आस्थापनाच्या संघटनांनी उत्स्फूर्तपणे पुढील तीन ते चार दिवस आपापल्या आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे त्यांनी सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ,पोलीस, महसूल, स्वच्छता विभाग,मीडिया, आदी सर्व यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत ह्या सर्व यंत्रणेसाठी जनता कर्फ्यू दिवशी सायंकाळी पाच वाजता नागरिकांनी आपल्या घरातच दरवाज्याजवळ, खिडकीजवळ ,गॅलरीत येऊन टाळ्या वाजवाव्यात त्याच्या पाठीवर कौतुकाची द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले .
जनता कर्फ्यू मधील आपल्या सर्वांचा सहभाग हा येणाऱ्या काळात कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी फार महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.