सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महानगरपालिका कडून दंडाची कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी (दिनेश चोरगे) दि.२१ : जगभरामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका स्तरावर विविध उपाययोजना सुरु आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज सार्वजनिक ठिकाणी थुंकले बद्दल ११  नागरिकांनकडून कळंबारोड व गांधी मैदान येथे कारवाई करुन प्रत्येकी रुपये- १५०/- प्रमाणे  एकूण १६५०/- रुपये दंड वसूल करण्यात आला.

याअंतर्गत आज विरोधी पथकाने कारवाई करुन एकूण रु.१६५०/- रुपये दंड वसूल केला. यामध्ये मयुरेश ढाले, सिध्देश वडगावकर, किशोर पाटील, सादिक मनोळे, रोहन  काळे, अमित कळंत्रे, स्वप्निल मस्के, प्रशांत कांबळे , निलेश पाटील, आरिफ पठाण, जाफर मलीक यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर,  आरोग्य निरीक्षक ऋषीकेश काळे व कर्मचारी यांनी केली.

Advertisements

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *