कोल्हापूरच्या रस्त्यावर आज नीरव शांतता

कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (रविवारी ) २२ मार्च रोजी म्हणजे आज सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्युचे संपूर्ण देशभरात आवाहन केले .
या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांना स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडणे टाळले. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर अजिबात वाहतूक नाही ,तर माणसांची गर्दी नाही. कोल्हापूर शहरातील चौकाचौकात गर्दी नव्हती. कर्फ्यू सुरू झाल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत तरी रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.
दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली, भाजी मंडई ,बाजारपेठा, ओसाड पडल्या होत्या. फेरीवाले ,रिक्षा ,चारचाकी, दुचाकी चालकांनी घरीच राहणे पसंत केले .प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता एखादी दुचाकी व चारचाकी दिसताच पोलीस विनंती करून घरीच थांबा असे आवाहन करत होते. कोल्हापुर ची लोकल वाहतूक म्हणजे केएमटी बसेस आणि एसटी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. शहरातील बस स्टँड सह ,राजारामपुरी ,महाद्वार रोड ,दाभोळकर कॉर्नर ,हायवे आणि सर्वच रस्स्यावर नीरव शांतता दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *