Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, बिंदू चौक, गंगावेश, रंकाळा, भवानी मंडप, महाद्वार रोड, गुजरी, लक्ष्मीपुरी हे नेहमी गजबजलेले परिसर आज बंद होते. चौका-चौकात पोलीस पथके तैनात होती. जनतेने दिलेल्या या प्रतिसादाबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी जनतेचे आभार मानले. तसेच जनतेनेही पाच वाजता टाळ्या, थाळ्या आणि घंटांचा नाद करत सर्व सरकारी यंत्रणा,डॉक्टर,परिचारक आणि परिचारिका , सर्व महापालिका प्रशासन,वीज कर्मचारी फायर ब्रीग्रेड, पत्रकार,प्रेस फोटोग्राफर, तसेच पोलीस यंत्रणेला पाणी पुरवणाऱ्या सामाजिक संघटनाच्या सेवेला कृतज्ञता व्यक्त केली.
Share Now