विशेष वृत्त प्रकाश कांबळे
कोल्हापूर : वाठार ता हातकणंगले येथे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त हनुमान मंदिर वाठार येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी दिली
विलासराव कोरे फाउंडेशन वारणानगर व सिद्धिविनायक नर्सिंग होम व सिद्धिविनायक आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत सल्ला, मार्गदर्शन व उपचार यामध्ये अँजिओग्राफी सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे तसेच मोफत मोतीबिंदू व डायबेटिक रेटीनोपॅथी तपासणी शिबिर यामध्ये दारिद्र्य रेषेखालील व बीपीएल कार्डधारकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे तज्ञ डॉ सिद्धार्थ पाटणे व डॉ संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय नवे पारगाव यांच्या वतीने मोफत दंत तपासणी शिबिर यामध्ये दारिद्र्य रेषेखालील व बीपीएल कार्डधारकांना मोफत उपचार करण्यात येणार आहे तसेच अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांचे सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महेंद्र शिंदे यांनी दिली