कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए लिग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर २-० गोलने मात करून तीन गुणांची कमाई केली. सामन्यातील दोन्ही गोल इचिबेरी याने नोंदविले . कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ आणि रंकाळा तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ गोल बरोबरीत सुटला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
दिलबहार विजयी प्रारंभ…..
दिलबहार आणि जुना बुधवार पेठ यांच्यातील सामन्यात दिलबहारच्या इचिबेरीने नोंदवलेले दोन गोल महत्वपूर्ण ठरले. ३८ आणि ४९ व्या मिनिटास गोल करून पूर्वार्धाच मोठी आघाडी घेतली. गोलची परतफेड करण्यासाठी जुना बुधवारकडून रविराज भोसले, अभिषेक भोपळे, रिचीमॉंड व प्रकाश संकपाळ यांनी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेर पूर्णवेळेत २-०ची आघाडी राखत दिलबहारने विजयावर शिक्कामोर्तब केले.