कोल्हापूर : सतेज कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे प्रदर्शन यशस्वी झाले आहे. त्यामधून शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीची माहिती उपलब्ध केली होती.त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी विविध पिके शेतीत घेऊन पिकांमध्ये विविधता आणली पाहिजे.भविष्यामध्ये शेतीमध्ये विविध पिके घेऊन शेतकरी कसा अग्रेसर राहील याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच घटकांसाठी काम करण्यासाठी आम्ही शासन स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध राहू असे आश्वासन खासदार संजय मंडलिक यांनी आज सतेज कृषी प्रदर्शन समारोपप्रसंगी दिले. कोरोनाचा कालावधी असतानाही सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरविण्याचा चंग बांधला होता. तो त्यांनी यावर्षी मोठे कृषी प्रदर्शन भरून पूर्ण केला आहे. असे सांगितले या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती मिळाली आहे. शेतकरी ते ग्राहक असा तांदूळ महोत्सव या ठिकाणी पार पडला. शेतकऱ्यांना चांगले तंत्रज्ञान अनुभवता आले कोल्हापूर जिल्ह्याचे शेतकरी हा स्वाभिमानी शेतकरी आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न शेतकरी करतो आहे असे सांगितले.
यावेळी बी.व्ही.ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांनी बोलताना बी.व्ही.जी ग्रुपच्या माध्यमातून गायकवाड यांनी विविध आजाराबाबत अभ्यास केला आहे.जनावरांचाही त्यांनी अभ्यास केला आहे.त्यांनी कृषी तंत्रज्ञान यावर पुस्तकाची निर्मिती केली आहे.याचा उपयोग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल असे सांगितले.सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाटील यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती पोहोचविण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.सध्या भाकड जनावरांची संख्या मोठी आहे अशी जनावरे आम्ही चांगली करू शकतो आमच्याकडे द्यावीत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रस्ताविकपर भाषणात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी एवढे चांगले प्रयोग एवढे चांगले औषध असतील काही अवजार असतील काही घरगुती वापरासाठी शेतीतल्या गोष्टी असतील एक्वा फोनिक सारखी शेती असेल वर्टीकल शेती असेल घरी आपल्याला भाजीपाला करता येईल या पद्धतीचा तंत्रज्ञान असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडले होते. त्याला शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला त्यामुळे कृषी प्रदर्शनाच्या चार दिवसांमध्ये दहा कोटींची उलाढाल ही होऊ शकली याचे सर्व श्रेय शेतकरी व जनतेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांनाही माहिती असलेली नवनवीन तंत्रज्ञाने आमच्यासमोर सांगावीत आम्ही ती पुढील वर्षी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी पुढे आणू असे सांगून सतेज पाटील यांनी पुढील वर्षी २२ डिसेंबर २५ डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी प्रदर्शन होईल अशी घोषणा केली.
ऑर्डरी चांगल्या मिळालेल्या आहेत ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान या ठिकाणी तंत्रज्ञान हे सगळं लोकांच्या पर्यंत प्रदर्शनाच्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे ही आमची भूमिका याठिकाणी होती. संयोजक टीमचे कौतुक केले.
सामान्य शेतकऱ्याला पटेल आणि या व्यवसायामध्ये तो येऊ शकेल या पद्धतीचा मार्गदर्शन केले म्हणजे अनेक चांगले शेतकरी आहेत की जय शेतकरी चांगले प्रयोग करतात उसाचे उत्पादन करतात फुलाचे उत्पादन करतात फळाचे उत्पादन करतात भाजीपालाचे उत्पादन करतात जनावर अगदी आपल्या घरच्या पोराप्रमाणे जगावण्याची निगा ठेवतात अशा सगळ्या गोष्टी ज्या मातीच्या आपल्या निगडित आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून लोकांचे धन्यवाद या निमित्ताने देतो. मागच्या वर्षी कोविड मुळे आपल्याला करता आलं नाही परंतु पुढच्या काळामध्ये देखील नवीन तंत्रज्ञान नव्या गोष्टी चांगल्या संकल्पना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगितले.
येणाऱ्या भविष्य काळात देखील या जिल्ह्याचा शेतीतला उत्कर्ष शेतीतला विकास करण्याची भूमिका आम्हा सगळ्यांची राहील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर खासदार संजय मंडलीक, माजीमंत्री आ. सतेज पाटील, हणमंतराव गायकवाड, ( बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख ) ए वाय पाटील, अमरसिंह पाटील (नगराध्यक्ष, शिरोळ ), मोहनलाल माळी (मा. नगराध्यक्ष पेठवडगाव ), श्रीमती प्रविता सालपे, प्रतापसिंह देसाई, राहूल खंजिरे, संदीप नरके, अजयसिंह देसाई, धीरज पाटील, प्रतिक्षा पाटील