ऑनलाइन पत्रकारितेच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या मेळावा….!

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दि. ८ जानेवारी रोजी अध्यासनाच्या नवीन इमारतीत आयोजित केला आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा होईल, अशी माहिती अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या आतापर्यंत चार बॅचेस बाहेर पडल्या आहेत. डिजिटल माध्यमाचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज विविध माध्यमात कार्यरत आहेत.काही विद्यार्थ्यांनी स्वतःची वेब पोर्टल्स, युट्युब चॅनल सुरू केलेली आहेत. या सर्वांना एकत्र करून पत्रकारिता विद्यार्थ्यांसाठी या पुढील काळात विविध उपक्रम राबवण्याबाबत या मेळाव्यात चर्चा होणार आहे. या मेळाव्याला विध्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. शिवाजी जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *