Share Now
Read Time:49 Second
Breaking News
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेचा सकाळी ६ वाजता छापा टाकला. साखर कारखाना घोटाळा प्रकरणी हि चौकशी करण्यात येत असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून मिळाली आहे.
सकाळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गटाला धक्का बसला आहे. हसन मुश्रीफ सध्या घरी नसल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या घरी असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
Share Now