पी.ओ.पी वरील बंदी संदर्भात महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट….!

कोल्हापुर : पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत यासह राज्य शासनामार्फत केंद्र शासन व मे.न्यायालयाकडे सादर करण्यात येणारा अहवाल कुंभार समाजाकरिता सकारात्मक असावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेवून केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने मूर्तिकार शिष्ठमंडळाची मुख्यमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा पार पडली. यावेळी यावर तातडीने तोडगा काढून मूर्तीकारांना दिलासा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली.

 यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर, हेमंत कुलकर्णी, मनोज कुंभार, आप्पा मसवडकर, शिवसेना उपशहरप्रमुख अभिजित कुंभार, कोल्हापूर जिल्हा मूर्तिकार संघटना अध्यक्ष संभाजी माजगावकर, उपाध्यक्ष अनिल निगवेकर, रवी माजगांवकर, शिवाजी वडणगेकर, प्रथमेश निगवेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *