(IND Vs SL) शतकांचा बादशहा विराट कोहली….!

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 33 Second

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला आज खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा क्रीडाविश्वाची मने जिंकली. विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील ४५ वे शतक पूर्ण करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७३ वे शतक ठरले…

रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी ‌१४३ धावांची भागीदारी करत भारताला मोठ्या लक्ष्याच्या दिशेने नेले. गिल बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या विराटने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. खराब चेंडूवर चौकार षटकार आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही तो थांबला नाही. गोलंदाजांवर त्याने वर्चस्व गाजवत ८० चेंडूंवर आपले ४५ वे वनडे शतक पूर्ण केले गवसणी घातली. यामध्ये १० चौकार व १ षटकाराचा समावेश आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *