Share Now
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिसरात कोल्हापूर कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना मारहाण करण्यात आली. शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना आज, बुधवार दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रमेश मोरे आज महापालिकेत शिष्टमंडळासोबत माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांना माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून आंदोलन का करता असा जाब विचारत मारहाण केली.
या घटनेनंतर मंगळवार पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मारहाणीनंतर मंगळवार पेठेतील चार फुटबॉल टिम समर्थक मोठ्या संख्येनं मिरजकर तिकटी येथे जमून प्रति हल्ल्यासाठी शिवाजी पेठेकडे निघाले होते यावेळी वरिष्ठ मंडळींनी मध्यस्थी करत समजूत काढून वाद मिटवला. परंतु भविष्यात शिवाजी पेठ विरुद्ध मंगळवार पेठ असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Share Now