INDvsNZ : शुभमन गिलचा द्वीशतकी धमाका…. भारताचा न्युझीलंड वर रोमांचक विजय….!

हैद्राबाद : अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवला. शुबमन गिलने भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.आणि सलामीवर शुभमन गिल याने तुफानी फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले आहे.सलामीला फलंदाजीस आलेला शुभमन गिलने तब्बल ५० षटके फलंदाजी केली. त्यात त्याने २०८ धावा काढल्या. यासाठी त्याला १४९ चेंडूंचा सामना करावा लागला आहे. शुभमनच्या या दुहेरी शतकामुळे भारतीय संघ आज विजयी झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *