कोल्हापूर : आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी पार पडणार आहे. उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता हा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, उपाध्यक्ष माजी खा. हरीभाऊ राठोड, माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी, सचिव धनंजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मेळाव्यात शंभरहुन अधिक टिप्परचालक व इतर मान्यवरांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. पक्षप्रवेश करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केले आहे.