धनुष्यबाण कुणाचा : पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी…!

मुंबई : शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आज निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी सुरु झाली. दोन्ही गटाच्या गोष्टी ऐकल्या नंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी ३० जानेवारी होईल अशी घोषणा केली.

आज झालेल्या सुनावणी मध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद झाले पक्षाची घटना, राष्ट्रीय पक्ष कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने दोन्ही गटांना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्याची सूचना केली आहे.सोमवारी दोन्ही गटाचे उत्तर आल्यानंतर आयोग निकालासाठी तारीख देण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *