मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत पार पडला. मुंबईतील राहत्या घरी म्हणजेच अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याचा साखरपुडा पार पाडला. या सोहळ्यासाठी अँटिलिया बंगल्याला रोषणाईनं उजळलं निघाले होतं. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. गोल धना आणि चुनरी विधी या परंपरेप्रमाणे दोघांचा साखरपुडा झाला. या सोहळ्याच्यावेळी मुकेश अंबानीच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. समोर आलेल्या फोटोमध्ये मुकेश आणि नीता अंबानीची मुलगी आणि जावई आनंद पीरामलही उपस्थिती दाखवली. यावेळी राधिकाने गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केला होता त्यामुळे अंबानींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी आली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
या सुवर्णसंध्येला राधिकाने गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या वरून कोणाचीच नजर हटत नाही आहे. मुळात ऑफ व्हाईट रंगाच्या या लेहेंग्यावर गोल्डन रंगाची नक्षी काढण्यात आली होती. या लेहेंग्यावर अतिशय बारिक आणि नाजूक नक्षी काढण्यात आली होती. या लेहेंग्यावर तीने सारख्याच रंगाचा डिपेनेक ब्लाऊज परिधान केला होता. राधिकाचा हा लुक सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.
दिमाखदार सोहळा त्यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी बॉलिवूडचे अनेक स्टार उपस्थित होते. शाहरुख सलमान पासून ते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.