कोल्हापुरात लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 23 Second

पन्हाळा – काखे गावातील सत्यजित महादेव खुडे (वय २८) या लष्करी जवानाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून गुरुवारी दुपारी आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले. सत्यजित खुडे हे गुजरात येथे जेडी डिपार्टमेंट मध्ये सेवा बजावत होते.१ जानेवारी रोजी ते सुट्टी घेऊन गावी आले होते

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सत्यजित महादेव खुडे (वय २८) हे भारतीय सैन्यदलात काम करत होते. ते गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होते. यावर्षी १ जानेवारीपासून ते आपल्या काखे गावी सुट्टीवर आले होते. मात्र काल दुपारच्या सुमारास सत्यजित हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान त्यांचा भाऊ सुनील हा सत्यजित यांना उठविण्यासाठी गेला असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घाबरलेल्या भावाने सत्यजित यांना तातडीने उपचारासाठी कोडोली येथील यशवंत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सत्यजित यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली. याचबरोबर सत्यजित यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत देखील चर्चा सुरू आहे.जवान सत्यजित यांचा विवाह झाला असून त्यांच्या मागे आई-वडील पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *