कोल्हापूरचा स्टार फुटबॉलर अनिकेत जाधव ओडिशा एफसीकडून करारबद्ध….!

कोल्हापूर : कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव ज्याने देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे.सध्या देशातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आयएसएल साठी ओडिशा एफसीकडून दोन कोटी १० लाख रुपयांच्या करारावर करारबद्ध झाला आहे. इतक्या मोठ्या रकमेवर करारबद्ध होणारा तो एकमेव महाराष्ट्रीयन फुटबॉलपटू आहे. आता आयएसएल स्पर्धेत ओडिशा एफसीकडून तो प्रतिनिधित्व करणार आहे.

अनिकेतने २०१७ साली भारतात झालेल्या सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर भारतीय फुटबॉल महासंघाच्या ॲरोजचे (२०१७-१८), तर जमशेदपूर एफसी (२०१९-२०), हैदराबाद एफसी (२०२१-२२), इस्ट बेंगाल (२०२२-२३) या संघांचे त्याने प्रतिनिधित्व देखील केले आहे. त्याचा खेळ पाहून आता ओडिशा एफसी संघाने त्याला दोन कोटी १० लाखांच्या करारावर करारबद्ध केले असून

Advertisements

दरम्यान, आगामी हिरो आयएसएल चषक स्पर्धेत ओडिशा एफसीची जर्शी घालणे हा माझ्याकरिता मोठा सन्मान आहे. मला या अभूतपूर्व क्लबचे आणि ओडिशाच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे  फुटबॉलपटू अनिकेत जाधव ने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *