Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
कोल्हापूर : कोल्हापुरातील छ. शिवाजी रोडवर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केएमटी बसला अचानकपणे आग लागल्याची घटना घडल्याने गोंधळ निर्माण झाला अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांची धांदल उडाली.
राजारामपुरीहून-आर के नगर कडे जाणाऱ्या के एम टी बसला,छ. शिवाजी रोडवर -जाधव कोल्ड्रिंक समोर असलेल्या बस स्टॉपवर अचानक पणे आग लागली.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.यावेळी प्रसंगावधान राखून चालक आणि वाहकांनी प्रवाशांना बस स्टॉपजवळ बाहेर उतरवल. दरम्यान फायर एक्सटेन्शन द्वारे आग विझवण्यात आली. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
Share Now