ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे जयंती दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित चर्चात्मक बैठकी प्रसंगी ते बोलत होते.शहरात विविध ठिकाणी फळवाटप ,महाप्रसाद,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ,रिमांड होम बिस्कीट वाटप ,रक्तदान शिबिर यांसारखे समाजोपयोगी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

यावेळी बोलताना पवार म्हणाले,मातोश्रीशी नाळ जोडलेला शिवसैनिक कोठेही गेलेला नाही.पैसा येतो,पैसा जातो पण निष्ठा कोठेही जात नाही.शिवसैनिक बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत.पद्मा चौकात जयंती दिनी फोटोपुजन करण्यात येणार असून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशा सूचनाही यावेळी पवार यांनी शिवसैनिकांना केल्या आहेत.

 यावेळी शहरप्रमुख सुनील मोदी,युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *