पालकमंत्री यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा….

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:6 Minute, 3 Second

कोल्हापूर : महापूर व पावसामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे नवीन रस्ते तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून ७० कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे मुंबई येथून घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळावा याबाबत मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री महोदय यांनी ७० कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा निधी त्वरित उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने नगर विकास विभाग व पालकमंत्री कार्यालयाशी नियमित संपर्क ठेवावा. या निधीतून कोल्हापूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी व आवश्यक ठिकाणी नवीन रस्ते करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

 जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपालिकांनी नगरोत्थान अभियानाअंतर्गत मंजूर करण्यात येत असलेल्या निधीतून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात. तसेच शहरात पाणीपुरवठा सुरळीत ठेवून स्वच्छता मोहीम काटेकोरपणे राबवावी. प्रत्येक शहरात चांगली शौचालये निर्माण करावीत. ती दिवसातून किमान तीन ते चार वेळेस स्वच्छ करण्याबाबतची यंत्रणा कार्यान्वित करावी. घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. अग्निशामन दल अद्यावत करावेत, त्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री त्वरित खरेदी करावी. या निधीतून आपल्या शहरात चांगले बदल घडवून आणावेत, अशा सूचना पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केल्या.

  महानगरपालिका तसेच नगरपालिकांनी शहरी भागातील बचत गटांसाठी त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी विक्री केंद्र उभा करावीत. तसेच तत्पूर्वी बचत गटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून तात्काळ महापालिका व नगरपालिकांनी काही गाळे उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीतील सर्व शासकीय यंत्रणेचा निधी खर्च बाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन जे विभाग ३१ मार्च २०२३ अखेर पर्यंत निधी खर्च करु शकणार नाहीत त्या विभागाचा निधी तात्काळ समर्पित करुन घ्यावा, अशा सूचना दिपक केसरकर यांनी दिल्या.

 कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नगरोत्थान मधून अधिक निधी मिळण्याची मागणी केली तर इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त देशमुख यांनी कोल्हापूर शहराप्रमाणे इचलकरंजी शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी पंधरा कोटीचा निधी तसेच इचलकरंजी नवीन महानगरपालिका असल्याने शासनाकडून मिळणारे शंभर कोटीचे पॅकेज व जीएसटीचे अनुदान मिळण्याची मागणी केली.

  यावेळी नगरोत्थान अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिका दहा कोटी, इचलकरंजी महानगरपालिका नऊ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तर प्रत्येक नगरपालिकेला लोकसंख्येप्रमाणे निधीचे वाटप करण्यात येऊन सदरचा निधी प्रस्तावित केलेल्या कामासाठी नियोजन विभागाने वितरित करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिले.

  यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *