कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कायम गजबजलेले असली तरी तिला एक शासकीय झालर असते. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि विविध कारणांनी कार्यालयात येणारे सामान्य माणसं, फाईलचे गठ्ठे नेणारे शिपाई, कर्मचारी यांची धावपळमुळे हा परिसर गजबजलेला असतो. प्रजासत्ताक दिना निमित्त कार्यालयाची संपूर्ण इमारत अत्यंत देखण्या अशा विद्युत रोषणाई ने सजली आहे.

