बोन्द्रेनगर येथील ७७ झोपड्पट्टीधारकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण ….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 20 Second

कोल्हापूर : बोंद्रेनगर येथील झोपडपट्टी अतिक्रमण हटवून येथील ७७ लोकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी लाभार्थ्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक सदनिका देण्याविषयी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुणे येथील शेल्टर असोसिएट, प्रधानमंत्री आवास योजना, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरे मिळण्यासंदर्भात प्रयत्न केले होते. 

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले आज या वसाहतीतील ७७ युनिट धारकांच्या घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. गृहनिर्माण मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर करण्याचे भाग्य मला लाभले. या ७७ घरांसह कोल्हापुरात १०४ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती.

हा प्रकल्प लवकरात लवकर तसेच दर्जेदार व परिपूर्ण होईल याकडे माझे वैयक्तिक लक्ष असेल. तसेच लाभार्थ्यांना शासनाकडून अडीच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. याशिवाय कमीत कमी व्याजदरात अर्थपुरवठा होण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सतेज पाटील सांगितले. 

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, शेल्टर असोसिएटच्या संचालिका सौ. प्रतिमा जोशी, सौ. पल्लवी पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, इंद्रजीत बोन्द्रे, कै . महिपतराव बोन्द्रे सह. गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अशोक देगावे, सचिव भिकाजी वायदंडे, खजिनदार शीतल शिंदे, नागोजी पाटील, अभिजित देठे यांच्यासह लाभार्थी उपस्थित हते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *