निम्म्या शहरात सोमवारी पाणी पुरवठा बंद….!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 56 Second

कोल्हापूर : १३० के.व्ही.ए. चंबुखडी सबस्टेशन मधील दुरुस्ती / मेन्टेनन्स कामाकरीता सोमवार दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी महावितरण मार्फत शिंगणापूर जल उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील नागरीकांना शिंगणापूर योजनेतून होणारा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच मंगळवार दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजी पेठ, चंद्रेश्वरगल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट परिसर, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपींगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, वाय पी पोवार नगर परिसर मिरजकर तिकटी. त्याचप्रमाणे संपूर्ण राजारामपुरी १ ली ते १३ वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेंन्शन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीनपार्क, शाहुपूरी १ ली ते ४ थी गल्ली, व्यापारपेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, महाडिक वसाहत इत्यादी इत्यादी भागातील नागरीकांना सोमवार, दि.३१ जानेवारी २०२३ रोजी होणारा पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *