सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’च ३ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 5 Second

कोल्हापूर : आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेले पाण्याखालचे जग ‘गडद अंधार’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अनेक रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा ‘गडद अंधार’ हा सुपर नॅचरल थ्रिलरपट ३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते अवधेश सिंग आणि दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मन मोहून टाकणारी पाण्याखालची सिनेमेटोग्राफी हे या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असणार आहे. वरवर निळ्याशार दिसणाऱ्या समुद्राच्या खोल पाण्यात गडद अंधार आहे. या गडद अंधारात बरीच रहस्य दडलेली आहेत. पाण्याखालच्या अंधारात दडलेले एक रहस्य जेव्हा जमिनीवरील प्रकाशात येतं तेव्हा काय घडतं ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गायक – संगीतकार रोहित राऊतने या चित्रपटाला संगीत दिलेले आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून चित्रपटातील दरिया, दरिया.. हे गाणं चांगलं धुमाकूळ घालत आहे. बिग बॉस आणि एम टीव्ही स्प्लिट्सविला एक्स 3 फेम जय दुधानेसह नेहा महाजन या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे. दर्जेदार निर्मिती मूल्ये, कसदार अभिनय, मुद्देसूद लेखन, कर्णमधुर गीत – संगीत, नेत्रदीपक कॅमेरावर्क, गतिमान संकलन आणि अफलातून दिग्दर्शनाचा उत्तम नमुना गडद अंधारच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात जय दुधाने, नेहा महाजनसह शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, बालकलाकार अस्था आदींच्या भूमिका आहेत. रोहित राऊतसह या चित्रपटात जुईली जोगळेकर आणि दिव्यकुमार यांनीही गाणी गायली आहेत. आदिनाथ पातकर यांनी गाण्याचे संयोजन केले असून प्रवीण वानखेडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. गडद अंधार चित्रपट सर्व प्रेक्षकांनी आवर्जून पहावा व पहिल्या मराठी सुपर नॅचरल थ्रिलरपटाची मजा अनुभवावी, असे आवाहन या चित्रपटाच्या टीमने केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *