कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांनी दिनांक ०२ फेब्रुवारी पासून आंदोलनाचा तसेच परीक्षांच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडथळा येत असल्याने हिवाळी सत्रातील दि.०३ व ०४ फेब्रुवारी रोजीच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांनी दिनांक ०२ फेब्रुवारी पासून आंदोलनाचा तसेच परीक्षांच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडथळा येत असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दिनांक ०२ फेब्रुवारी रोजीच्या विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा दि. ०१ फेब्रुवारी रोजीच्या पत्रान्वये स्थगित करण्यात आल्याबाबत शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेली सर्व महाविद्यालये, संस्था, अधिविभाग यांना कळविण्यात आलेले आहे.
तथापि सदरच्या परीक्षा कामावरील बहिष्कार अद्यापही सुरु असल्याने दि.०३-०२-२०२३ व दि. ०४-०२-२०२३ रोजीच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहेत याची सर्व संस्था, विद्यार्थी, पालक शिक्षक व संबंधित घटक यांनी नोंद घ्यावी.
दिनांक ०२ फेब्रुवारी रोजीपासून स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक व सविस्तर माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.