पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणारी परप्रांतीय टोळी जाळ्यात

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 9 Second

विशेष वृत्त अजय शिंगे 

कोल्हापूर: सोने पॉलिशच्या बहाण्याने महिलांची दिशाभूल करून दागिने लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. सहा जणांच्या टोळीकडून साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले सर्व संशयित बिहारमधील असून, त्यांच्यावर बिहारसह सातारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील वाळवे येथे २० जानेवारी रोजी दोन भामट्यांनी सोने पॉलिश करून देतो, असे सांगून एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र गायब केले होते. दरम्यान कागलमध्ये सोने पॉलिशचे काम करणारे काही संशयित राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी साफळा रचून म्होरक्या सचेनकुमार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आणि इतर आरोपींची नावे देखील सांगितली त्यानंतर याच्या इतर पाच साथीदारांनाही अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी सचेनकुमार योगेंद्र साह , बौआ राजू बडई , कुंदनकुमार जगदेव साह , आर्यन अजय गुप्ता धीरजकुमार परमानंद साह, आणि भावेश परमानंद गुप्ता.

  रेकॉर्डवरील या टोळीला जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पथकास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २५००० चे बक्षीस जाहीर केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *