कोल्हापूर : रोटरीने प्रथमच कोल्हापूर शहरात आयोजीत केलेला अन्नपूर्णा मोहत्सव हा इतर मोहत्सवा पेक्षा वेगळा आहे. या महोत्सवातुन मिळणारा निधी हा रोटरी करवीर तर्फे गरीब होतकरू लोकांना वाटप केला जाणार आहे.असा समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद असून तो प्रत्येक वर्षी रोटरीच्या वतीने राबवावा. असे आवाहन माजी प्रांतपाल संग्राम पाटील यांनी केले. ते आयर्विन ख्रिश्चन मैदानावर भरलेल्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
रोटरी क्लब करवीरच्यावतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी मोहत्सव प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल रो. संग्राम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी सुभाष इव्हेंट चेअरमन संभाजी पाटील, यांचे मनोगत झाले. स्वागत रोटरी क्लब करवीर चे अध्यक्ष उदय पाटील यांनी केले.
खाद्यपदार्थांचे ३० स्टाॅल आहेत. सर्व प्रकारचे शाकाहारी मांसाहारी स्टाॅल आहेत, घरगुती उपयोगी साहीत्याचे ९० स्टाॅल असुन त्याचे दालन भरले आहे हे प्रदर्शन आयर्विन ख्रिश्चन मैदानावर २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ही इव्हेन्ट चेअरमन संभाजी पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला रोटेरीयन दिलीप शेवाळे, दिलीप प्रधाने, सुभाष आलेकर, प्रमोद चौगुले, हरेष पटेल, चंदाराणी पाटील, डॉ विशाल चोकाककर, माजीद सनदी, ज्ञानदेव केसरकर, आनंदा कुंभार, इरफान पठाण