रोटरी क्लब ऑफ करवीर च्या अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 8 Second

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे उदघाटन नुकतेच सम्पन्न झाले. हा महोत्सव दि. २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानावर सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे. या पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात खाद्य व खरेदीसह होणाऱ्या रंगतदार कार्यक्रमात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट रो. उदय पाटील , सेक्रेटरी रो. स्वप्नील कामत आणि इव्हेंट चेअरमन रो. संभाजीराव पाटील व सेक्रेटरी हरीश पटेल यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे पास्ट डिस्ट्रिक गव्हर्नर रो . संग्राम पाटील व असिस्टंट गव्हर्नर रो. सुभाष कुत्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गरजू व ग्रामीण भागातील मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. सायंकाळी कराओके ट्रॅक सिंगिंग हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

   दि. ३ फेब्रुवारी रोजी दिव्यांगांना जयपूर फूट व गरजू क्षयरोग्यांना धान्य वाटप करण्यात आले शिवाय सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉऊन्सिलर कौंटुबिक न्यायालय सौ. सुवर्णा भुजबळ व असिस्टन्ट गव्हर्नर रो . अनिरुद्ध तगारे उपस्थित होते.

 उद्या ४ फेब्रुवारी सायंकाळी रॉक बँड तर दि. ५ फेब्रुवारी रोजी मराठमोळी ठसकेदार लावणी अश्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचा समारोप विविध संस्था व सदस्यांच्या सत्काराने ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे.रो. प्रमोद चौगुले,रो. चंदाराणी पाटील, खाजनिस रो. दिलीप प्रधाने, व रोटरी क्लब करवीर चे सदस्य उपस्थित होते.

आजच्या लकी ड्रॉचे विनर्स…

1- आदिती सुतार – Water Purifier

2-किशोर नार्वेकर – Water Purifier

3-गीता छाबडिया – Gas Gysar 

4-तनिष्का दळवी – Gas Gysar 

5- रमेश चव्हाण – पैठणी साडी 

6- तनिष्का झुंजार -पैठणी साडी 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *