शहरात फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 31 Second

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी: कोरोना विषाणूचा शहरात वाढता प्रभाव लक्षात घेता फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी करून महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

 आज महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटरद्वारे देवकर पाणंद मेनरोड, सुर्वे नगर रिंगरोड, जिवबा नाना जाधव पार्क, कणेरकर नगर, फुलेवाडी १ ते ६ वा बसस्टॉप रोड, शाहूपूरी पूर्ण रोड, राजेंद्रनगर रोड या परिसराच्या ठिकाणी हायपो सोडियम क्लोराईटची औषध फवारणी करण्यात आली आहे.

तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आज शहरात चार ट्रॅक्टरद्वारे ताराबाई पार्क, सानेगुरुजी वसाहत, रुईकर कॉलनी, गजानन महाराज नगर या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली.

तसेच आज विभागीय कार्यालय क्र.१ अंतर्गत भाजी मार्केटचे विकिंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने देवकर पाणंद पेट्रोल पपंरोड, नानापाटील नगर, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजा भवानी मंदिर रोड, रायगड कॉलनी या ठिकाणी ठरावीक अंतरावर भाजी विक्रेते बसविण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.२ अंतर्गत ताराबाई रोड, साकोली कॉर्नर , रंकाळा एसटी स्टँड ते पापाची तिकटी, लक्ष्मीपूरी मेनरोड येथे भाजी विक्रेत्यांना बसवण्यात आले व विभागीय कार्यालय क्र.३ अंतर्गत रेल्वे फाटक जवळील भाजी विक्रेतांना लॉ कॉलेज जवळील रस्त्यावर बसविण्यात आले. तर विभागीय कार्यालय क्र.४ अंतर्गत धैर्यशिल माने चौक ते पितळी गणपती रोड, जनता बाजार चौक राजारामपूरी या ठिकाणी ठरावीक अंतरावर भाजी विक्रेते बसविण्यात आले आहेत .

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *