समाजसेवेत स्वरा फाउंडेशनचे एक पाऊल पुढे

कोल्हापूर प्रतिनिधी (दिनेश चोरगे ) :धावपळीच्या युगात स्वतः चे कुटुंब व स्वतः चे व्यवहार सांभाळत सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून प्रमोद माजगावकर यांनी आपल्या भागातील काही तरुणांना एकत्र करून आपल्या समाजासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे ,असं मनात ठेवून स्वरा फाउंडेशन ची स्थापना केली.

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या आयुक्तांची झाडे लावा, झाडे जगवा व स्वच्छता अभियान, ही संकल्पना प्रमोद माजगावकर यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना खूपच भावली.
पहिल्यापासूनच मनामध्ये समाजासाठी सेवा करण्याची जिद्द होती त्याला जोड मिळाली ती आयुक्तांच्या विचारांची.
स्वरा फाउंडेशनची सर्व टीम एकजूट होऊन ज्या ज्या ठिकाणी वृक्ष नाहीत त्या त्या ठिकाणी आपल्या टीमच्या सहकार्याने झाडे लावण्यास सुरुवात केली आणि बघता बघता शेकडा, हजार, लाखोच्या संख्येत अनेक ठिकाणीचे परिसर स्वच्छ करून झाडे लावण्यात आली. परंतु २०१९ च्या महापुरा मध्ये काही झाडे वाहून गेली, तर काय काही झाडे जगली ,तर काहींना पालवी फुटली. निसर्गाची आवड असलेल्या स्वरा फाउंडेशनने आपले कार्य तसेच पुढे ठेवले. याची दखल घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सामाजिक संस्थांना एकत्र करून कोल्हापूर स्वच्छतेचे अभियान राबवण्याचे ठरवले व त्यात प्रामुख्याने स्वरा फाऊंडेशनला निमंत्रित केले .

Advertisements

महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निमंत्रित केल्यामुळे स्वरा फाउंडेशनला उभारी आली. व स्वरा फाउंडेशनच्या सर्व टीमने सहभाग घेऊन अनेक परिसराची स्वच्छता करुन कचरामुक्त सुंदर कोल्हापुर केले .
स्वरा फाउंडेशनचा मुख्य हेतू संकटकाळी मदतीसाठी धावून पुढे येण्याचा आहे .
आज जगात कोरोना विषाणूचा थैमान घातलेल्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन असल्याने स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता देशसेवेसाठी झटणाऱ्या पोलीस कर्मचारी डॉक्टर , आरोग्य कर्मचारी , पत्रकार प्रतिनिधी व सेवा बजावणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना तसेच ज्या लोकांना घर नाही, नातेवाईक नाही ,जे पोटासाठी मागून खातात व फुटपाथचा आसरा घेऊन राहतात या सर्व लोकांना फाउंडेशन तर्फे सॅनेटायझर बॉटल ,मास्क ,नाश्ता व पाणी बॉटल देऊन स्वरा फाउंडेशनची संपुर्ण टीम मदतकार्य करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *