कोल्हापूर प्रतिनिधी (रोहित वज्रमठे) : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज वेब कॉन्फरन्सद्वारे सर्व अधिकारी, व आरोग्य निरिक्षक यांचा आढावा घेतला.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे आदेशानुसार शहरातील सर्व प्रभागामध्ये सदस्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती स्थापन करणेच्या सुचना दिल्या. या समितीमध्ये सार्वजनिक मंडळे, सार्वजनिक तालीम, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, महिला बचत गट, सर्व आरोग्य निरिक्षक, मुकादम यांचा समावेश या समितीमध्ये करणेचा आहे. या समिती मार्फत संबंधीत प्रभागामध्ये अत्यावश्यक सेवा सुविधा म्हणजेच औषध दुकाने, किराणा दुकाने, दुधविक्री याठिकाणी समितीने नियंत्रण ठेवेणेचे आहे.
तसेच या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता समितीने घेण्याची आहे. संबंधीत प्रभागामध्ये परगावी/परदेशातून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरीकांवर नियंत्रण ठेवून संबंधीत नागरीकांना चौदा दिवस होम कोरोनटाईन, इन्सीटयुशन कोरोनटाईन म्हणजेच अलगीकरणामध्ये ठेवणेस मदत करणेचे आहे. कोरोनाटाईन नागरीक सार्वजनिक ठिकाणी अथवा इतर नागरीकांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता समितीने घेणेची आहे.
खाजगी वाहने, दुचाकी, चारचाकी, विनाकारण फिरणारे नागरीक यांच्याकडून संचारबंदीचा भंग होणार नाही याची दक्षता या समितीने घेण्याची आहे.
तसेच महापालिकेच्या सर्व आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा साहित्य म्हणजेच मास्क, हातरुमाल , ग्लोज, सॅनीटाजर, साबन इत्यादी साहित्याचा दैनंदीन कामकाजावेळी वापर करणेचा आहे.
शहरातील सर्व प्रभागात औषध व धूर फवारणी वेळचेवेळी होईल याची दक्षता घेणेची आहे.
या वेब कॉन्फरन्स मध्ये अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, परवाना अधिक्षक राम काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडीत पोवार, सर्व आरोग्य निरिक्षक ऑनलाईन होते