कोल्हापूर: गेले पाच दिवसांपासून चाललेल्या रोटरी क्लब ऑफ करवीर ने आयोजित केलेल्या रोटरी अन्नपूर्णा खाद्य आणि खरेदी महोत्सवास आज शेवटच्या दिवशी कराओके ट्रॅक सिंगिंग चे आयोजन करण्यात आले होते. तरुणाई बरोबरच आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाला.पूर्व प्रांतपाल श्रीनिवास मालू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या लकीड्रॉच्या सर्व मानकर्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
अत्यंत शिस्तबद्ध झालेल्या या महोत्सवात रक्तदान, मोफत हेल्थ चेकअप, श्रवण यंत्र वाटप, सायकल वाटप, क्षयरोग्यांना धान्य वाटप, जयपुर फूट वाटप असे अनेक उपक्रम घेण्यात आले. या पाच दिवसाच्या कार्यक्रमास कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असे मत क्लबचे प्रेसिडेंट उदय पाटील यांनी व्यक्त केले. इव्हेंट चेअरमन संभाजीराव पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे प्रेसिडेंट उदय पाटील सेक्रेटरी स्वप्निल कामत इव्हेंट चेअरमन संभाजीराव पाटील इव्हेंट सेक्रेटरी हरेश पटेल, रो.प्रमोद चौगुले रो.चंदाराणी पाटील निलेश भादुले, संजय चव्हाण, सुभाष आलेकर, अंकुश कारंडे, शितल दुग्गे, दिलीप प्रधाने, दिलीप शेवाळे, निशिकांत नलवडे, सुहास मिठारी, प्रवीण सिंह शिंदे, संदीप पवार यांनी परिश्रम घेतले.