विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना निवेदन…!

कोल्हापूर : ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमणाचा विळखा आजही कायम असून. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि शिवप्रेमी विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी पाठपुरावा करत आहेत.पुरातत्त्व खात्याने विशाळगड वरील अतिक्रमण काढावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनातील जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य वनसंरक्षक, पुरातत्त्व अधिकारी, प्रांत ,तहसीलदार, यांची बैठक घेऊन १८ फेब्रुवारी महाशिवरात्री या दिवशी विशाळगडावर अतिक्रमण काढण्यास सुरुवात करू असे जाहीर केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे स्मरण करून देण्यासाठी, महाशिवरात्रीच्या आत विशाळगडावरील अतिक्रमण काढून विशाळगड किल्ला अतिक्रमण मुक्त करावा या मागणीसाठी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन देण्यात आले.१८ फेब्रुवारी फेब्रुवारीच्या आत जर विशाळगड किल्ला अतिक्रमण मुक्त झाला नाही तर विशाळगडावर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला.

Advertisements

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुशील भांडीगिरे, अनिल पाटील, शशिकांत बिडकर ,दीपक भाऊ, राजेंद्र पाटील, सुनील कारुलकर, रणजीत आयरेकर ,प्रतिगण्या उत्तरे, अवधूत साळुंखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *