Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
कोल्हापूर : विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट हे नियत वयोमानानुसार दि. ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी जिल्हा माहिती अधिकारी (कोल्हापूर) सुनील सोनटक्के यांच्याकडे उपसंचालक (माहिती) पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती /प्रशासन) यांच्या आदेशान्वये आज त्यांनी रितसर पदभार स्विकारला.
यावेळी सहायक संचालक फारुख बागवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी सर्वश्री रविंद्र चव्हाण, सतीश शेंडगे, रोहित माने, दामू दाते, श्रीमती वृषाली कदम, रोहिणी कोईगडे उपस्थित होते.
Share Now