Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
मुंबई: सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर येथे होणाऱ्या ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेळीच लोकांनी जागृत झाले पाहिजे यासाठी लोकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आहावन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. सुमंगलम उत्सवाचे निमंत्रण सिद्धगिरी मठाचे विश्वस्त उदय सावंत यांनी त्यांना दिले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले “पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरेच्या संरक्षणासाठी कडक शब्दांत समज देणार नाही तर विनाश अटळ आहे यासाठी मी कणेरी मठ कोल्हापूर येथे होऊ घातलेल्या पंचमहाभूत लोकोस्तवात अवश्य सहभागी होणार” अशी खास ठाकरी शैलीत प्रतिक्रिया दिली.
Share Now