सदाशिवराव मंडलिक आयटीआय रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स पुणे कंपनी मध्ये ९० युवकांना रोजगार……!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 36 Second

हमिदवाडा : सदाशिवराव मंडलिक आयटीआय हमीदवाडा कार्यस्थळावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजय दादा मंडलिक व जय शिवराय संस्थेचे कार्याध्यक्ष विरेंद्र संजय मंडलिक यांनी केले होते. या रोजगार मेळाव्यास जिल्हा व सीमा भागातील आयटीआय प्रशिक्षणार्थी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

       ह्या मेळाव्यास देशातील नामांकित कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड पुणे ही प्लेसमेंटसाठी निमंत्रित करण्यात आली होते. या कंपनीमध्ये सदाशिवराव मंडलिक आयटीआय व रोजगार मेळाव्यास उपस्थित इच्छुक उमेदवारांतून सुमारे ९० युवकांची निवड टाटा मोटर्समध्ये झालेली आहे .त्यापैकी सदाशिवराव मंडलिक आयटीआय मधील ६० विद्यार्थी आहेत तर ३० इच्छुक हे कोल्हापूर जिल्हा व परिसरातील आहेत.

टाटा मोटर्स कंपनीमध्ये शिकाऊ व कुशल उमेदवारांची फिटर, वेल्डर ,इलेक्ट्रिशन, टर्नर शीट मेटल, मशिनिस्ट ,ऑटो मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक ग्राइंडर, पेंटर जनरल ,टूल अँड डाय मेकर इत्यादी तेरा व्यवसायाकरिता ५०० हून अधिक उमेदवारांची भरती आगामी काळात केली जाणार आहे. या कंपनीकडून निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सुविधा विद्या वेतन ,रजा इत्यादींची तरतूद मोफत असून प्रशिक्षणार्थ्यांचे वय 18 ते 24 वर्षे असावे. अशी माहिती टाटा मोटर्स कंपनीचे दीपक निळे व आशिष सूर्यवंशी यांनी दिली.

  मंडलिक आयटीआय मध्ये आयटीआय स्थापनेपासून तीन हजार हून अधिक विद्यार्थी स्वयं रोजगार व अनेक कंपनीमध्ये कार्यरत आहेत आय टी आय हा अ दर्जा प्राप्त असून लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी व रोजगार उपलब्ध करण्यासाठी स्थापन केला आहे. तो अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा आमचा प्रयत्न राहील तसेच आय टी आय उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार युवकांनी रोजगार प्राप्तीसाठी काॅलेज शी संपर्क साधावा. असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात युवा नेते अॅड विरेंद्र मंडलिक यांनी मांडले . यावेळी स्वागत संग्राम सोरप सर यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य अमोल वास्कर सर यांनीकेले ,यावेळी संस्थेचा आढावा व शिकाऊ उमेदवार योजनेची माहिती दिली.आभार संतोष पोवार सर यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *