विविध सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला लोकोत्सवाची किनार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरला. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 

 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने सकाळी युवासेनेच्या वतीने श्री अंबाबाई मंदिर, कसबा बावडा विभागाच्या वतीने ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर येथे व भुयेवाडी ग्रामदैवत श्री.भैरवनाथ मंदिर येथे शाखा भुयेवाडी यांच्यावतीने मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती होवो, असे साकडे घालून महाभिषेक करण्यात आला. 

Advertisements

यानंतर शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ यांचे वतीने पंचगंगा हॉस्पिटल येथे आयोजित महिलांसाठीच्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा लाभ शेकडो महिलांनी घेतला. या कार्यक्रमास मनपा उपायुक्त शिल्पा दरेकर आदी भागातील नागरिक उपस्थित होते. शिवसेना विभाग राजारामपुरी यांचे वतीने पांजरपोळ येथील गो- शाळेस चारावाटप करण्यात आले. यासह आर.के.नगर येथील मातोश्री वृधाश्रम येथे फळेवाटप करण्यात आले. शिवसेना विभाग उत्तरेश्वर पेठ व शुक्रवार पेठ यांच्यावतीने गंगावेश चौक येथे गरजूंना खिचडी वाटप करण्यात येणार आहे. तर कोल्हापुरी थाळीचे संयोजक पापा प्रभावळे यांच्या वतीने गरजूंना मोफत अन्नदान करण्यात आले. शिवसेना कोल्हापूर दक्षिण विभागाच्यावतीने चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप करण्यात आले. शिवसेना विभाग मंगळवार पेठ आणि जुना बुधवार पेठ यांचे वतीने मंगळवार पेठ येथील अंधशाळेतील मुलांना फळे व अल्पोपहार वाटप करण्यात आले. यासह मंगळवार पेठ विभागाच्या वतीने शालेय खेळाडूंना पाटाकडील तालीम येथे फुटबॉल किटचे वाटप करण्यात आले. शिवसेना विभाग जुना बुधवार पेठ यांच्यावतीने विवेकानंद शाळा जुना बुधवार पेठ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवशक्ती – भीमशक्ती शाखा राजेंद्र नगर यांचे वतीने सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला.

 शिवसेना शाखा भुयेवाडी यांच्या वतीने कन्यामंदिर भुयेवाडी येथील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी तर शिवसेना करवीर विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे आयुष्यमान आरोग्य शिबीर पार पडले. सोनतळी येथील वि.म.लोहिया कर्णबधीर विद्यालय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तर जयभवानी गल्ली, भुयेवाडी येथे शेतकरी बांधवासाठी शासकीय योजनांची माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शासकीय योजनांच्या माहितीसह आधारकार्ड, पॅनकार्ड, श्रमिक कार्ड आदी शासकीय योजनांची माहिती व दुरस्ती आदीचा लाभ शेकडो ग्रामस्थांनी घेतला. 

   सायंकाळी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी, विविध सामाजिक उपक्रमातून लोकप्रिय नेतृत्वाच्या वाढदिवसाला लोकोत्स्वाची किनार लाभल्याचे सांगितले. या नंतर कसबा बावडा विभागातर्फे “एकनाथ चषक” भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा ट्रॉफी अनावर सोहळा पार पडला यासह केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, मा.स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, रमेश खाडे, प्रा.शिवाजीराव पाटील, शहर समन्वयक सुनील जाधव, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, महानगरप्रमुख श्रीमती पूजा भोर, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, रिक्षासेना शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, निलेश हंकारे, रियाज बागवान, कपिल नाळे, दीपक चव्हाण, मंदार तपकिरे, रुपेश इंगवले, धनाजी कारंडे, मुकुंद सावंत, सुरेश माने, बाळासाहेब शेलार, सचिन भोळे, रणजीत मंडलिक, कपिल केसरकर, क्रांतीकुमार पाटील, राजू काझी, अमित चव्हाण, श्रीकांत मंडलिक, अमित कांबळे, कृष्णा लोंढे, सुनील करंबे, युवासेनेचे कुणाल शिंदे, सौरभ कुलकर्णी, विपुल भंडारे, महिला आघाडीच्या सौ.गौरी माळतकर, सौ.पूजा कामते, श्रीमती मीनाताई पोतदार, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.पूजा पाटील, सौ.शारदा भांदिगरे यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

 दरम्यान सायंकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेवून चांदीची ढाल-तलवार, पुष्पहार, शाल देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *