कोल्हापूर : रिप्रोडक्टिव मेडिसिन क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन केलेल्या कार्याबद्दल कोल्हापूर येथील डॉ.पंकज काईंगडे संस्थापक आणि संचालक रेप्रोहेलिक्स लॅबस कोल्हापुर यांना ISAR (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन) यांचे कडून १) ISAR डॉक्टर गौतम खास्तगीर सर्वोत्कृष्ट संशोधक – भ्रूणशास्त्रज्ञ संशोधन पुरस्कार, तामिळनाडूचे शिक्षण मंत्री के. पोनमुडी, व २) ISAR डॉक्टर मनीष बँकर, यंग अचिव्हर्स – भ्रूणशास्त्रज्ञ पुरस्कार भारतीय अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते मध्यप्रदेश भोपाळ याठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ISAR चे अध्यक्ष डॉक्टर नंदिता पालशेतकर, FOGSI चे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश पै., डॉक्टर शांता कुमारी व डॉक्टर सुजाता कर इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होती. भारत देशामध्ये पहिल्यांदाच असे दोन पुरस्कार प्राप्त करणारे कोल्हापूर येथील एकमेव व्यक्ती आहे. या पुरस्कारासाठी डॉक्टर सचिन कुलकर्णी, डॉक्टर गोरख मंद्पकर, डॉक्टर डी स्वामीनाथन, डॉ. अमर निकम यांचे मार्गदर्शन लाभले. सद्या डॉक्टर पंकज काईंगडे सुनंदा IVF येथे एमरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
सध्याची बदलती जीवनशैली, मानसिक ताणतणाव यांसह अनेक कारणांमुळं स्त्री-पुरुष जननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत चाललाय, याबाबतचं महत्त्वपूर्ण संशोधन कोल्हापुरातील नामवंत भ्रूण शास्त्रज्ञ डॉ. पंकज काईंगडे यांनी केलंय. गेली १३ वर्षं भ्रूणशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणार्याक डॉ. काईंगडे यांचा तामिळनाडू सरकार तसंच मध्यप्रदेशमध्ये विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. पंकज काईंगडे हे गेली १३ वर्षं मानवी भ्रूणावर अभ्यास करत असून, ते खासगी आयव्हीएफ रूग्णालयात एमरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच गेल्यावर्षी त्यांनी आपल्या संशोधनावर आधारित रेप्रो हिलिक्स लॅब सुरू केलीय. डॉ. पंकज काईंगडे यांनी आतापर्यंत १२ वैद्यकीय ग्रंथांची समीक्षा केलीय. याचबरोबर अन्य विषयांवरही त्यांचं विपुल लिखाण झालंय. सध्या ते अमेरिकेतील स्प्रिंगर नेचर पब्लिशरच्या सहकार्यानं मातेच्या दुधातील पूरक घटकांवर संशोधनात्मक लेख लिहित आहेत.