कोल्हापूर : आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने एक वर्षापासूनच तयारी सुरू केलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले
कोल्हापुरातील बालाजी गार्डन या ठिकाणी आयोजित केलेल्या कोल्हापूर व हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होती अध्यक्ष स्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीत घाडगे हे होते तर खासदार धनंजय महाडिक माजी आमदार सुरेश राव हळवणकर आमदार अमल महाडिक महानगराध्यक्ष राहुल चिकोडे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघ हे निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा प्रवास योजनेत समाविष्ट केलेले आहेत या प्रवास योजनेच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर हातकलंगले आणि कोल्हापूरची जबाबदारी दिलेली आहे त्याचबरोबर देशातील काही प्रमुख नेते ही या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत निवडलेल्या मतदार संघाचा प्रवास करणार असून यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अमित शहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे या पद्धतीने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा भरगच्चासा दौऱ्याचा कार्यक्रम असून या दौऱ्यामध्ये ते भारतीय जनता पार्टीने नव्याने बांधलेल्या कार्यालयासमोर गणेश मंदिराचा भूमिपूजन करतील त्यानंतर पार्टीच्या शक्ति केंद्र बूथ आणि पदाधिकाऱ्यांचा मेळाव्याला संबोधित करतील आणि रात्री आठ वाजता हॉटेल पॅवेलियन या ठिकाणी बारा विधानसभा मतदारसंघाच्या कोर टीम बरोबर बैठक करतील असा हा कार्यक्रम असून या दौऱ्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेशराव जाधव, हिंदुराव शेळके महिला आघाडीचे अध्यक्ष शोमिका महाडिक, गायत्री राऊत, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अशोकराव माने, अनिलराव यादव, राहुल देसाई, अल्केश कांदळकर, प्रवीण सावंत, डॉक्टर सुभाष जाधव, सम्राट महाडिक, राहूल महाडिक संजय पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व टीम प्रमुख उपस्थित होते.